एक्स्प्लोर

ICC Concussion Substitute Rule : जिंकण्यासाठी कोच गौतम गंभीर खरंच खालच्या स्तरावर गेला का? जाणून घ्या काय सांगतो ICC चा कन्कशन नियम

Harshit Rana makes T20I debut as concussion substitute : या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा एक निर्णय सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जो म्हणजे हर्षित राणाला संघात घेणे.

What is ICC Concussion Substitute Rule : हार्दिक पांड्या, शिवम दुबे यांच्या अर्धशतकांनंतर रवी बिश्नोई आणि हर्षित राणा यांच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथ्या टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर 15 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. भारताने 20 षटकांत 9 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली. पण पाहुण्या इंग्लंडला 19.4 षटकांत सर्वबाद 166 धावांवर रोखत भारताने विजय मिळवला. 

खरंतर, या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा एक निर्णय सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जो म्हणजे हर्षित राणाला संघात घेणे. त्याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हर्षित राणाने शिवम दुबेच्या जागी पदार्पण केले आणि 3 विकेट घेतल्या. पण आता सोशल मीडियावर इंग्लंड संघाचे अनेक स्टार खेळाडू टीम इंडियावर बेईमानीचा आरोप करत आहे. आपण जाणून घेऊया की आयसीसीचा कन्कशन सबस्टिट्यूट नियम काय आहे आणि तो कसा अंमलात आणला जातो?

जाणून घ्या काय सांगतो ICC चा कन्कशन नियम

आयसीसीच्या नियमात असे म्हटले आहे की, कन्कशन पर्याय हा ज्या खेळाडूचा बदली असेल तो तिच भूमिका बजावणारा असायला हवा. म्हणजे गोलंदाजाला-गोलंदाज, फलंदाजाला-फलंदाज आणि ऑलराउंडरला-ऑलराउंडर. पण शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे, जो मध्यमगती गोलंदाजी शकतो, दुसरीकडे, राणा हा एक स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज आहे. म्हणजे या सामन्यात, एका ऑलराउंडरऐवजी एका गोलंदाजाचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला.

आयसीसीचा कलम 1.2.7.4 सांगतो की, "कन्कशन रिप्लेसमेंटला सारखे खेळाडू मानले जावे की नाही याचे मूल्यांकन करताना, आयसीसी मॅच रेफरीने उर्वरित कालावधीत खेळाडूने खेळलेली संभाव्य भूमिका विचारात घ्यावी. सामना आणि सामान्य भूमिका जी कन्कशन रिप्लेसमेंटद्वारे केली जाईल. त्यामुळे आयसीसी मॅच रेफ्रीने राणाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याची परवानगी देण्यात आली होती.  कारण तिच भूमिका दुबेने बजावली असती, त्यामुळे राणा संघात कायम राहिला. लाइक फॉर लाइक या नियमासाठी आणखी समर्थन म्हणजे दोन्ही खेळाडू वेगवान गोलंदाज आहेत.

टीम इंडियावर बेईमानी केल्याचा आरोप

पण आता, सोशल मीडियावर भारतीय संघावर बेईमानी केल्याचा आरोप होत आहे. एका व्यक्तीने म्हटले की अष्टपैलू खेळाडूची जागा फक्त एका अष्टपैलू खेळाडूने घ्यायला हवी होती. शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू असल्याने, त्याच्या जागी पूर्णवेळ गोलंदाज हर्षित राणाला घेण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच वेळी, कोणीतरी संपूर्ण भारतीय संघावर आणि विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

हे ही वाचा -

Harshit Rana Concussion Substitute Controversy : टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! इंग्लंडचा कर्णधार संतापला; भारताच्या स्टार खेळाडूने सुद्धा उपस्थित केला 'गंभीर' प्रश्न

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; कारवाई होणार, सीईओंचे आदेश
जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; कारवाई होणार, सीईओंचे आदेश
मतचोरीबाबत ट्विट, CSDS च्या संजय कुमारांविरुद्ध नागपूर, नाशिकमध्ये गुन्हा दाखल; तहसिलदारांनीच दिली तक्रार
मतचोरीबाबत ट्विट, CSDS च्या संजय कुमारांविरुद्ध नागपूर, नाशिकमध्ये गुन्हा दाखल; तहसिलदारांनीच दिली तक्रार
Jalgaon Crime: पतीकडून झोपेत असलेल्या पत्नीची क्रूरपणे हत्या, सकाळी स्वत:हून पोलिसात हजर; जळगाव हादरलं
पतीकडून झोपेत असलेल्या पत्नीची क्रूरपणे हत्या, सकाळी स्वत:हून पोलिसात हजर; जळगाव हादरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
मोठी बातमी! पावसात भिजलेल्या मुंबईकरांनो 72 तासांत वैद्यकीय सल्ला घ्या; आयुक्तांचे आवाहन, लेप्टोच्या संसर्गाची शक्यता
जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; कारवाई होणार, सीईओंचे आदेश
जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; कारवाई होणार, सीईओंचे आदेश
मतचोरीबाबत ट्विट, CSDS च्या संजय कुमारांविरुद्ध नागपूर, नाशिकमध्ये गुन्हा दाखल; तहसिलदारांनीच दिली तक्रार
मतचोरीबाबत ट्विट, CSDS च्या संजय कुमारांविरुद्ध नागपूर, नाशिकमध्ये गुन्हा दाखल; तहसिलदारांनीच दिली तक्रार
Jalgaon Crime: पतीकडून झोपेत असलेल्या पत्नीची क्रूरपणे हत्या, सकाळी स्वत:हून पोलिसात हजर; जळगाव हादरलं
पतीकडून झोपेत असलेल्या पत्नीची क्रूरपणे हत्या, सकाळी स्वत:हून पोलिसात हजर; जळगाव हादरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2025 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2025 | मंगळवार 
ICC नं चूक सुधारली, वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहली पुन्हा टॉप टेनमध्ये, पहिल्या स्थानावर कोण?
आयसीसीकडून गलतीसे मिस्टेक, रोहित शर्मा अन् विराट कोहली पुन्हा टॉप टेनमध्ये, अखेर चूक सुधारली
अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्षा मीना, परभणीतही कलेक्टर बदलले; राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्षा मीना, परभणीतही कलेक्टर बदलले; राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मोठी बातमी : शरद पवारांसाठी महादेव जानकर ढाल बनले, टीकाकारांना म्हणाले, OBC हिताचा निर्णय पवारांनीच घेतला!
मोठी बातमी : शरद पवारांसाठी महादेव जानकर ढाल बनले, टीकाकारांना म्हणाले, OBC हिताचा निर्णय पवारांनीच घेतला!
Embed widget