(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटणार की वाढणार? ABP Majha
मागील जवळपास १२ दिवसांपासून एसटीचं शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. याच संपामुळे एसटी महामंडळाला आतापर्यंत जवळपास १५० कोटींचा फटका बसलाय. त्यामुळे एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी महामंडळ 'यूपी पॅटर्न' राबवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. कालच्या बैठकीत यावरही चर्चा झाल्याचं कळतंय.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आंदोलक एसटी कर्मचारी कामावर परत न आल्यास नव्या कामगारांना कामावर घेण्याचे स्पष्ट संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. अगोदरच्या नोकरभरतीमधल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचं, परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 2019 साली सरळसेवा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या साडेतीन हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती एसटी महामंडळातल्या वरिष्ठ सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे.