![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ST Ticket Rate Hike : एसटीची दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द
ST Ticket Rate Hike : एसटीची दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द
दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दरवर्षी 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळानं भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्याभरात एसटीनं प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.
हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द करण्यात आल्यानं महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम मिळणार नाही. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास महागणार होता. आता मात्र त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जात असते, त्या प्रमाणं या वर्षी देखील निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द करण्यात आला आहे.
![Cabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/cb26524ceb0dcd9b953b1b1d5b3a59541734239489303719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/8a772da3a021e8fcb774873d560ea78a1734236494646719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Wind Power : धाराशिवमधील मेसाई जळगावात पवन चक्की ठेकेदारांची दहशत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/4224dc1d18ac2e3890876baaa90ff14b1734232926855719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/fb3d82313d98ca308bc81e3e463f423a1734232047429719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 15 डिसेंबर 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/049df350409d694de071034557daedd91734228165452719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)