एक्स्प्लोर

लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...; अजित पवारांनी सांगितली लोकसभेनंतरची परिस्थिती अन् लाडकी बहीण योजनेचं गणित

Ajit Pawar : विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. ईव्हीएमवर बोलत आहेत. लोकसभेला जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला तो त्यांनी मान्य केला, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.

बारामती : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा बारामती मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) सुप्रिया सुळे (Supriya Suke) यांनी पराभव केला. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाला लोकसभेत मोठा फटका बसला होता. यानंतर विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अजित पवार गटाने 53 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी तब्बल 41 उमेदवारांचा विजय झाला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यात लढत झाली. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी बाजी मारली.  अजित पवार आणि महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) फायदा झाल्याचे दिसून आले आहे. आता अजित पवारांनी लोकसभेनंतरची परिस्थिती आणि लाडकी बहीण योजनेचं गणित सांगितलं आहे.

बारामती शहरात बांधण्यात येणाऱ्या 100 रो हाऊसचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की,  विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. ईव्हीएमवर बोलत आहेत. लोकसभेला जनतेने महाविकास आघाडीला कौल दिला तो त्यांनी मान्य केला. विधानसभा निवडणुकीत 396 पैकी मी फक्त चार बूथमध्ये मागे आहे. बारामतीकरांसारखा मतदार देशात सापडणार नाही. येथे लोकसभेला मला 800 मते कमी होते, तर विधानसभेला दीड हजार मतं जास्त मिळालेत. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा एवढ्या जागा सरकारला मिळाल्या आहेत. बारामतीत मी इमारती बांधताना हवेत बांधू शकत नाही. त्याच्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना त्यांच्या जमिनी द्याव्या लागणार त्याचा मोबदला मी त्यांना देईल, असे त्यांनी म्हटले. 

मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण...

ते पुढे म्हणाले की, मोदींना मी सांगत होतो आम्हाला सगळ्या समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेऊन जायचं आहे. मोदींनी सांगितलं मी तुम्हाला मदत करत राहील. मी नास्तिक नाही. यावेळी माझ्या लाडल्या बहिणीने मला वाचवलं. लोकसभा झाल्यावर विचार करत होतो की, सरकार आलं पाहिजे. त्यातून ही योजना आणली. आमच्या मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण बहिणींनी योग्य बटणे दाबली, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Maharashtra Cabinet Expansion: महायुतीकडून आज कोण कोण मंत्रि‍पदाची शपथ घेणार? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची संभाव्य मंत्र्याची संपूर्ण यादी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget