Margashirsha Purnima 2024 : यंदाची मार्गशीर्ष पौर्णिमा 3 राशींसाठी ठरणार खास; 15 डिसेंबरपासून नशीब उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्सही वाढणार
Margashirsha Purnima 2024 Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार, 15 डिसेंबरपासून म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेपासून (Margashirsha Purnima 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल.
Margashirsha Purnima 2024 Horoscope : मार्गशीर्ष पौर्णिमेला (Margashirsha Purnima 2024) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, दरवर्षी मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला मार्गशीर्ष पौर्णिमेचं व्रत केलं जातं. यावेळी मार्गशीर्ष पौर्णिमा आज म्हणजेच 15 डिसेंबर 2024 रोजी आहे. या दिवशी ग्रहांचा एक दुर्मिळ योग घडत आहे, जो काही राशींचं भाग्य पालटू शकतो. या राशींवर 15 डिसेंबरपासून देवी लक्ष्मीची कृपा राहील आणि त्यांच्या हाती अमाप पैसा येईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
सिंह रास (Leo)
मार्गशीर्ष पौर्णिमा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याची ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात चांगले बदल दिसून येतील. तुम्हाला तुमच्या पालकांचं सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा बेत आखू शकता. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. परदेशातून नोकरी करणाऱ्या लोकांचा व्यवसाय विस्तारेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नवीन संधी मिळतील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष पौर्णिमा खास ठरेल. 15 डिसेंबरपासूनच्या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तब्येत सुधारेल. व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी हा काळ लाभदायक ठरू शकतो. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवाल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला भावा-बहिणींचं सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील. यासोबतच मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांसाठी मार्गशीर्ष पौर्णिमा फलदायी ठरणार आहे. या काळात तुमचं नशीब सोन्यासारखं उजळेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. करिअरमध्येही सकारात्मक बदल होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तुमची कोणतीही केस कोर्टात प्रलंबित असल्यास त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल. या काळात कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :