Special Report Opraton Sindoor : 48 तासात भारतीय सैन्याकडून 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
Special Report Opraton Sindoor : 48 तासात भारतीय सैन्याकडून 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारतानं आपला मोर्चा जम्मू काश्मीर भागातील स्थानिक दहशतवाद्यांकडे वळवलाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं १४ दहशतवाद्यांची एक यादी जाहीर केली होती. गेल्या ४८ तासात या यादीतील सहा दशतवाद्यांना भारतीय सैन्यानं कंठस्नान घातलंय. तर उरलेल्या ८ जणांचा शोध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ऑपरेशन केलरमध्ये तीन दहशतवादी ठार झाले होते. तर गुरुवारी सकाळी राबवलेल्या ऑपरेशन नादरमध्ये आणखी तीन दहशतवादी मारले गेले. पाहूयात काश्मीरच्या त्रालमधील नादरमध्ये राबवलेल्या या खास ऑपरेशनची ही सविस्तर कहाणी..
हे ही वाचा..
ऑपरेशन सिंदूरदमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव (India Pakistan Tension) शिगेला पोहोचलेला असताना चार दिवसांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यशस्वी मध्यस्थी करत शस्त्रसंधी घडवून आणल्याचं वक्तव्य केलं होतं. पण आता त्यांनी याच वक्तव्यावरून घुमजाव केला. भारत-पाकिस्तानमध्ये मी शस्त्रसंधी (India Pakistan Ceasefire) घडवून आणली नाही, पण तणाव निवळण्यास मदत केल्याचं वक्तव्य त्यांनी केलं.
आपण या दोन देशांमध्ये मध्यस्ती केली नाही, पण या दोन देशांदरम्यान जो तणाव निर्माण झाला होतो तो कमी करण्यास मदत केली असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. कतरमधील अमेरिकेच्या लष्करी कर्मचाऱ्यांशी संवाद साधतानास डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. या आधी जवळपास पाच वेळा ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये अमेरिकेने मध्यस्ती केल्याचा दावा केला होता.





















