Sangola Shivsena:"घर की मुर्गी दाल बराबर," Shivsena आमदार शहाजीबापू पाटलांची खदखद, पक्षाला घरचा आहेर
राज्यातील ठाकरे सरकारमध्ये शिवसेना आमदारही समाधानी नाहीत याची चर्चा अनेकवेळा समोर येते मात्र याचे प्रत्यंतर शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या एका भाषणातून समोर आले . शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत मात्र तालुक्यात शिवसेनेची केवळ ११०० मते असूनही मी आमदार झालो असे सांगताना भाजपची खूप मदत झाल्याचे त्यांनी उघड केले . प्रसंग होता पंढरपूर येथील डॉ बी पी रोंगे हॉस्पिटलच्या उदघाटनचा भाजप खासदार रणजित निंबाळकर , भाजप आमदार समाधान अवताडे , माजी आमदार प्रशांत परिचारक या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या उदघाटन समारंभात शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांच्या तुफानी फटकेबाजीमुळे खरी रंगत आली . मात्र त्यांनी आपल्या भाषणात शिवसेनेला आणि आघाडी सरकारला त्यांचा आरास दाखवायचेही काम केले .


















