एक्स्प्लोर

तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदे दिसत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे

Ramdas Kadam on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी एकनाथ शिंदे दिसत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे. शिंदे पंतप्रधानांना भेटले म्हणजे मोदी त्यांचे बॉस झाले का? असा सवाल देखील रामदास कदम यांनी केला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती; तेव्हा पंतप्रधान तुमचे बॉस झाले का? असा टोला कदमांनी ठाकरेंना लगावला. राज्याचा उपमुख्यमंत्री विकास कामांसाठी पंतप्रधानांना भेटू शकतो, असे कदम म्हणाले. तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत असेही कदम म्हणाले.

अधिवेशन काळात आदित्य ठाकरे यांच्या भाजप नेत्यांच्या भेटींचा रामदास कदमांनी दिला दाखला

उद्धव ठाकरेंनी आपण बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत, याची जाणीव ठेवावी. टीका करत बसा, आम्ही कामातून उत्तर देऊ असेही ते म्हणाले. अधिवेशन काळात देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांची आपल्या पिल्लाने बुके घेऊन भेट घेतली, याची माहिती घ्या. मग फडणवीस व अन्य नेते तुमच्या पिल्लाचे बॉस झाले का? असा सवालही कदम यांनी केला. अधिवेशन काळात आदित्य ठाकरे यांच्या भाजप नेत्यांच्या भेटींचा रामदास कदम यांनी दाखला दिला आहे. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात, हे लक्षात ठेवा असेही कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदेंविषयी केवळ द्वेष असल्याचे रामदास कदम म्हणाले. तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत असेही ते म्हणाले. टीका करत बसा, आम्ही कामातून उत्तर देऊ असे ते म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

चिंता नका, मी तुमच्या पाठिशी आहे हा धमकीवजा संदेश मोदींनी नेमका कोणाला दिलाय? आणि गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा घाबरून तुमची पळापळ का होतेय? का शेपट्या घालून तुम्ही मोदींकडे जाताय?" अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्ला चढवला. हा संपूर्ण घटनाक्रम सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ही लढाई आता केवळ शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेत आहे. संविधानाबद्दल प्रेम असणाऱ्या तमाम काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या देशभक्तांना मी आवाहन करतोय की, तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांना आपल्या देशातले तरुण भेटत नाहीत, अगदी रात्री मध्यरात्री एकदम Friends म्हणून त्यांना Instagram वरून संदेश देतात. आता Instagram वरून सरकार चालवण्याची वेळ आली आहे, एवढी यांची आता हालत खराब झाली आहे. जे काँग्रेसला जमलं नाही गेल्या 60-65 वर्षात, ते यांनी करून दाखवलं. कारण एवढ्या शिव्या आणि नालस्ती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या वाट्याला आलेली आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
तुम्ही गद्दार म्हणत राहा; तुमचा पक्ष संपतोय, शिंदेंचे आमदार-खासदार वाढतायत, रामदास कदमांचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातील पर्यायी महामार्गाला धोका; रस्ता खचला, सुरक्षा कठडे गेले वाहून 
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातील पर्यायी महामार्गाला धोका; रस्ता खचला, सुरक्षा कठडे गेले वाहून 
Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर ठरला आयुष्याचा शेवट; घरी जाताना दुचाकी घसरली, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू
शेवटचा पेपर ठरला आयुष्याचा शेवट; घरी जाताना दुचाकी घसरली, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget