एक्स्प्लोर
Konkan Politics: ठाकरेंनी युती नाकारताच, राणेंना हरवण्यासाठी Kankavli मध्ये दोन्ही शिवसेना एकत्र?
कोकणातील कणकवली (Kankavli) नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासोबत युती करण्यास नकार दिल्यानंतरही, स्थानिक पातळीवर भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांना शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना गट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे आमदार नितेश राणेंच्या विरोधात दोन्ही सेना एकत्र येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली असून, यासंदर्भात दोन्ही गटांच्या स्थानिक नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याचेही वृत्त आहे. जर हे दोन्ही गट एकत्र आले, तर कोकणातील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या राणे बंधूंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठे आव्हान मिळू शकते. त्यामुळे आता वरिष्ठ नेते या स्थानिक आघाडीला संमती देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















