एक्स्प्लोर
Alibag Protest : अलिबागमध्ये आरसीएफ कंपनीविरोधात शिवसेनेचं आंदोलन हिंसक, टायर जाळून निषेध
अलिबागमधील RCF कंपनीविरोधात शिवसेनेने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 'प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये सामावून न घेतल्यास येत्या सतरा ऑक्टोबरला काळी दिवाळी साजरी करू', असा थेट इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. आरसीएफ कंपनीबाहेर रस्त्यावर टायर जाळून शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी, प्रदूषण आणि परिसरातील रस्त्यांची दुर्दशा या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. आंदोलनादरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली, त्यानंतर पोलिसांनी आमदार दळवी आणि इतर शिवसैनिकांना अडवून ताब्यात घेतले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















