एक्स्प्लोर
SambhajiNagar School:दिव्यांग विद्यार्थ्यांचा अमानुष छळ, मुख्याध्यापकांवर कारवाईत दिरंगाईचा आरोप
शासकीय अनुदानित संस्थेत दिव्यांग विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. 'त्या व्यक्तीनं त्या मुलाचा का राग धरून त्या विद्यार्थ्याला मारहाण केली याची मला कल्पना नाही,' असा दावा शाळेच्या मुख्याध्यापकांनी केला आहे. पीडित विद्यार्थ्यांना कुकरच्या झाकण्याने आणि पोटात-पाठीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेचे 2018 पासूनचे व्हिडिओ पुरावे म्हणून समोर आले आहेत. आपल्यावर २८ तारखेला तक्रार झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी ३० तारखेला बचावासाठी पोलीस तक्रार केल्याचा आरोप होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या वेदना सांगता येत नाहीत, अशा मुलांसोबत झालेल्या या निर्घृण प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















