Maharashtra : राज्यातील भाजपच्या 12 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच ABP Majha
राज्यातील भाजपच्या बारा आमदारांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. या आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिलाय. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनावेळी गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत या आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. ओबीसी राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून इम्पेरिकल डेटा मिळावा यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला. मात्र अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. या निलंबनाच्या कारवाईविरोधात या १२ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भातील सुनावणीदरम्यान निलंबनाला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलाय. तसंच राज्य सरकारला नोटीस नोटीस देण्यात आली असून तूर्तास कुठलाही आदेश देण्यात आलेला नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी ११ जानेवारीला होणार आहे.