Satish Patil : एकनाथ खडसेंना प्रवेश देऊन चूक झाल्याची कबुली शरद पवारांनी दिली - सतीश पाटील
Satish Patil : एकनाथ खडसेंना प्रवेश देऊन चूक झाल्याची कबुली शरद पवारांनी दिली - सतीश पाटील एकनाथ खडसे यांना राष्ट्र वादी मध्ये प्रवेश दिला आणि उमेदवारी दिली होती आणि आता ते भाजपा मध्ये जात आहेत,या सगळ्या मध्ये आपली मोठीचुक झाल्याची कबुली शरद पवार यांनी आपल्या जवळ दिल्याची माहिती माजी मंत्री सतीश पाटील यांनी दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे एकनाथ खडसे.यांनी.राष्ट्र वादी मध्ये येताना आपण उत्तर महाराष्ट्र मध्ये राष्ट्र वादी पक्षाची ताकद वाढविण्याचे आश्वासन शरद पवार यांना दिले होते ,मात्र राष्ट्रवादी पक्ष वाढला तर नाहीच उलट राष्ट्रवादी पक्षाचे वाटोळे झाल्याचे डॉ सतीश पाटील यांनी म्हटल आहे राष्ट्र वादी साठी रावेर मतदार संघात एकनाथ खडसे यांचे उमेदवारी साठी नाव पुढे केले होतें मात्र त्यांनी आजार पणाचे कारण देत उमेदवारी करण्यास नकार दिल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत