पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकही सरळ चाल न टाकता फोडाफोडीचं राजकारण करतात, असा आरोप त्यांनी केला. "सलीम कुत्ता, दाऊद इब्राहिम, छोटा राजन हे देशद्रोही आता भाजपला चालतात," असे म्हणत त्यांनी भाजपला ‘देशद्रोही आणि ढोंगी पक्ष’ संबोधलं. "सलीम कुत्त्याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे," असा टोलाही त्यांनी लगावला.
उद्या खरी शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे गटाचा ५९ वा वर्धापन दिन असून उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील, असं राऊत म्हणाले. हिंदी भाषेच्या सक्तीवर त्यांनी आक्षेप घेत, "शाळांमध्ये हिंदीची सक्ती नको," अशी मागणी केली.
राज ठाकरेंबाबत विचारल्यावर, "ते राज्याचे नेते आहेत, काय बोलतात ते आम्हीही ऐकतो," असं त्यांनी नमूद केलं. भाजप भ्रष्ट नेत्यांच्या आधारावर सत्तेत असून, प्रफुल पटेल यांचे दाऊदशी संबंध असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच शब्द असल्याचे राऊतांनी अधोरेखित केले.


















