एक्स्प्लोर
Sanjay Raut on EC : 'निवडणूक आयोग ही BJP ची एक्सटेंडेड शाखा, ते चोर आहेत', संजय राऊतांचा घणाघात
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोग (Election Commission) आणि भाजपवर केलेल्या घणाघाती टीकेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. 'निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे आणि भाजपचे नेते चोर आहेत', असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पंतप्रधान मोदींच्या कृपेने मुख्यमंत्री झाले, असेही ते म्हणाले. याला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'ज्यांना पत्राचाळ घोटाळ्यामध्ये शंभर दिवस तुरुंगवास घडला आणि जे अजूनही जामिनावर बाहेर आहेत, त्यांनी घोटाळ्याबद्दल बोलू नये', असा टोला बन यांनी लगावला. आमचा विश्वास लोकशाहीवर असून जनतेने फडणवीसांना वारंवार निवडून दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement


















