Samruddhi Mahamarg :समृद्धी महामार्गावर अपघात; भंडारा रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा जीव गेला
Samruddhi Mahamarg :समृद्धी महामार्गावर अपघात; भंडारा रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा जीव गेला
समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव स्विफ्ट डिझायर गाडी आदळली. या भीषण अपघातात स्विफ्ट डिझायरमधील दोघांचा मृत्यू तर, अन्य दोन गंभीर जखमी असल्याची घटना आज दुपारी समृद्धी महामार्गावर औरंगाबादजवळ घडली. या भीषण अपघातात रासपाचे विदर्भ उपाध्यक्ष तथा भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके यांच्यासह संदीप साखरवाडे यांचा मृत्यू झाला. तर, रितेश भानारकर आणि सौरभ रामटेके हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा येथील हे पदाधिकारी मुंबईला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला.



















