एक्स्प्लोर

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?

EPFO New Rules 2026 :  ईपीएफओनं EPF, EPS आणि EDLI योजना 2026 नुसार पीएफच्या काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या नियमांचा कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.  

EPFO New Rules 2026 नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं EPF, EPS आणि EDLI योजना 2026 नुसार पीएफ संदर्भातील काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांचा उद्देश पीएफ खातेदारांसाठी नियम सुलभ करणे, पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी आणि सुरळीत करणे, सेवांना डिजीटल करणे आणि पीएफ क्लेम मंजूर करण्याची प्रक्रिया वेगवान करणे हा आहे. नव्या नियमांमध्ये कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या योगदानाची व्यवस्था कायम ठेवली आहे. मात्र, पीएफचे पैसे काढण्याच्या अटी, बेरोजगारीनंतर पूर्ण रक्कम काढण्याची कालमर्यादा, नॉमिनेशनआणि क्लेम सेटलमेंट यासंदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

पीफ खात्यात कर्मचारी आणि कंपनीचं योगदान किती? 
 
नव्या नियमांनुसार कर्मचाऱ्यांचं वैधानिक योगदान मूळ वेतनाच्या 12 टक्के कायम ठेवण्यात आलं आहे. पीएफमध्ये योगदान देण्याची  मूळ वेतनाची मर्यादा 15000  रुपये मासिक वेतन लागू आहे. या नियमानुसार दरमहा योगदान 1800 रुपये होतं. ज्यांचं मूळ वेतन 15000 रुपयांपेक्षा असेल ते स्वेच्छेनं पीएफमध्ये योगदान देऊ शकतात.

पीएफची 15000 वेतन मर्यादेत बदल शक्य

जुन्या ईपीएफ योजनेत 15 हजारांच्या वेतनमर्यादेचा उल्लेख होता. नव्या 2026 च्या नियमांमध्ये वेतन मर्यादेत केंद्र सरकारकडून वेळोवेळी बदल केले जाऊ शकतात.

पैसे काढण्याच्या नियमात बदल

ईपीएफओनं पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या वेगवेगळ्या नियमांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा पीएफ खात्यातून वेगवेगळ्या करणांसाठी पैसे काढण्याचे नियम वेगळे होते. आता पैसे काढण्यासाठी तीन गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. आवश्यक गरजा, घराशी संबंधित गरजा आणि विशेष परिस्थितीत पैसे काढता येऊ शकतात. 

पीएफ खात्यात 25 टक्के रक्कम किमान शिल्लक

नव्या नियमांनुसार ईपीएफच्या खात्यातील दोन भागांची व्यवस्था कायम राहील. यामध्ये 25 टक्के रक्कम किमान शिल्लक ठेवावी लागेल. निश्चित अटींसह 75 टक्के रक्कम काढता येऊ शकते. 

पीएफ काढण्यासाठी 12 महिन्यांची सेवा आवश्यक

नव्या नियमांनुसार पीएफ खात्यातून पैसे काढण्याचा कालावधी एकसमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे काढण्यासाठीची कालमर्यादा वेगळी होती. आता सामान्यपणे पैसे काढण्यासाठी 12 महिन्यांची सेवा पूर्ण करणं आवश्यक आहे. वैद्यकीय कारणांसाठी देखीलपैसे काढण्याची सेवा देखील 12 महिन्यांची अट ठेवण्यात आली आहे. 

नोकरी सोडल्यानंतर पूर्ण पीएफ काढण्यासाठी 12 महिन्यांचा वेळ 

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम काढण्यासाठी 2 महिने बेरोजगार राहिल्यानंतर तो पर्याय होता. नव्या बदलानंतर पीएफची पूर्ण रक्कम काढण्यास 12 महिने बेरोजगार राहिल्यानंतर तो पर्याय उपलब्ध असेल. पीएफ खातेदार पात्र असल्यास ठराविक रक्कम पीएफ खात्यातून काढता येऊ शकते.

पीएफ नॉमिनेशन पूर्णपणे डिजीटल 

ईपीएफओनं नॉमिनेशन  प्रक्रिया डिजीटल करण्यावर भर दिला आहे. नव्या नियमानुसार छापील नामांकन फॉर्म टप्प्या टप्प्यानं कमी करत ऑनलाईन नॉमिनेशनसाठी औपचारिक मान्यता देण्यात आली आहे.

पीएफ क्लेमवर 20 दिवसात निर्णय

नव्या नियमांनुसार पीएफ क्लेम मंजूर करणे, नामंजूर करणे यासाठी 20 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. 20 दिवसात क्लेमबाबत निर्णय न घेतल्यास जबाबदारी निश्चित करत दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे.  
    
दरम्यान, ईपीएफओच्या 2026 च्या नियमांनुसार पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया आणि डिजीटल सेवा सुरळीत करण्यावर जोर दिला जात आहे. निवृत्तिसाठीची रक्कम दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
RBI :रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
रुपया सावरण्यासाठी आरबीआयचा मोठा निर्णय, थेट डॉलर विक्री करणार, नियम कठोर करण्याचा निर्णय
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget