(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sambhajiraje Chhatrapati :विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात संभाजीराजे शाहूवाडी पोलीस स्थानकात
Sambhajiraje Chhatrapati :विशाळगडावरील अतिक्रमणासंदर्भात संभाजीराजे शाहूवाडी पोलीस स्थानकात किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणामध्ये विशाळगडावर आणि पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये प्रचंड नासधूस करण्यात आली. ज्यांचा अतिक्रमणाशी संबंध नाही अशा लोकांच्या मालमत्तेचं प्रचंड नुकसान झाले. यानंतर आता आज जिल्हा प्रशासनाला जाग आली असून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासनामधील प्रमुख अधिकारी गडावर पोहोचले आहेत. विशाळगडावर अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढली आहेत. गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी 14 जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला होता. विशाळगडावर काल रवींद्र पडवळ आणि संभाजीराजेंकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, संभाजीराजे गडावर पोहोचण्यापूर्वीच हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. यावेळी गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामध्ये हिंसाचाराचा प्रचंड उद्रेक झाला. यावेळी वाहनांची, घरांची तसेच इतर मालमत्तांची जोरदार नासधूस करण्यात आली.