(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Samarjeet Ghatge Speech Kagal:कागल विधानसभेत सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक घरात तुतारी पोहोचवा
Samarjeet Ghatge Speech Kagal:कागल विधानसभेत सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रत्येक घरात तुतारी पोहोचवा
आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातून पहिली खेळी केली असून समरजीत घाटगेंसारखा मोठा मोहरा आपल्या पक्षात घेतला आहे. विधानसभेसाठी रणशिंग फुंकलेल्या समरजीत घाटगेंनी कागलच्या गैबी चौकातील कार्यक्रमात शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने तरुणांनी हजेरी लावल्याचं दिसून आलं. गैबी चौक इतका खचाखच भरला होता की पाय ठेवायलाही जागा नव्हती.
या आधी गैबी चौकात तब्बल दहा वर्षांपूर्वी शरद पवारांनी हसन मुश्रीफ यांच्यासाठी सभा घेतली होती. आता त्यांच्या विरोधात लढणाऱ्या समरजीत घाटगेंना बळ देत शरद पवारांनी गैबी चौकात हजेरी लावली.
कागलचा गैबी चौक ऐतिहासिक
कागल शहराला ऐतिहासिक असं महत्व आहे. देशाला सामाजिक समतेचा संदेश देणारे शाहू महाराज यांचे मूळ गाव कागल. त्यामुळे शरद पवारांचे या मतदारसंघावर पहिल्यापासून लक्ष. या मतदारसंघातून एकेकाळी शरद पवारांचे शिष्य समजल्या जाणारे हसन मुश्रीफ हे पाच वेळा निवडून आले आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीत मुश्रीफांनी अजितदादांची साथ दिली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कागलची जागा राखायचीच या इर्षेने शरद पवारांनी थेट समरजीत घाटगेंना पक्षात घेतलं.
समरजीत घाटगे हे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जायचे. पण त्यांनी आता तुतारी फुंकत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. कुंपणावर असलेल्या राज्यातील अनेक नेत्यांना एक प्रकारचा राजकीय संदेश देणारा हा पक्षप्रवेश कागलच्या प्रसिद्ध गैबी चौकातच झाला पाहिजे अशी शरद पवारांची इच्छा होती. त्यामुळेच याच चौकात समरजीत घाटगेंचा पक्षप्रवेश करण्यात आला.