Shiv Sena BJP त विलीन करा; Amit Shah यांचा Eknath Shinde यांना सल्ला, Sanjay Raut यांचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या सामनाच्या आजच्या 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे. तुमचा पक्ष भाजपात विलीन करा, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार देखील केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
सामानाच्या रोखठोकमध्ये काय म्हटलंय?
वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेडमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत. छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली. आजही तशाच वतनांसाठी बेईमान दिल्लीत मुजरा झाडतात. उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला 'मराठा' जागा झाला. स्वाभिमानासाठी 'उठाव' केल्याची बोंब त्यांनी ठोकली. तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो. शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले. एकनाथ शिंदे हे शनिवारी, 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 'वेस्टइन' होटेलात ही भेट झाली. 57 आमदारांचा नेता अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता.






















