एक्स्प्लोर
Adani Row: 'स्वतःला फकीर म्हणवणारे Modi, Adani मार्गाने संपत्ती का एकवटतात?', Saamana चा थेट सवाल
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यातील संबंधांवरून पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विचारलेल्या प्रश्नाचा हवाला देत मोदींवर निशाणा साधण्यात आला. 'मोदी स्वतःला फकीर समजतात तर अदानींच्या मार्गाने इतकी संपत्ती का एकवटतात?', असा थेट सवाल 'सामना'मधून पंतप्रधानांना विचारण्यात आला आहे. 'वॉशिंग्टन पोस्ट'ने एलआयसीच्या पैशांच्या कथित गैरवापराबाबत केलेल्या वृत्ताचा संदर्भ देत, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 'अदानी भाजपचे नक्की कोण लागतात?' असा प्रश्न विचारला असून, या नात्याबद्दल पंतप्रधानांनी खुलासा करावा, अशी मागणी अग्रलेखात केली आहे. स्वतःला 'प्रधानसेवक' आणि 'फकीर' मानणाऱ्या मोदींचा मोहमायेशी संबंध नाही, मग ते अदानी समूहासाठी संपत्ती का एकवटत आहेत, अशी टीकाही करण्यात आली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion















