Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Rupali Thombre : Nishikant Dubey कुत्र्यासारखा,आपटून मारु; अजितदादांच्या वाघीणीचा थेट इशारा
Sushma Andhare slams Nishikant Dubey: भाजप खासदार निशिकांत दुबे हे मराठी माणसांना उचलून आपटून मारु, असे वक्तव्य करतात. त्यांची ही धमकी फक्त एकट्यादुकट्या व्यक्तीसाठी नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री आणि आमदारासाठी आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्हीदेखील मराठी आहात, ही धमकी तुम्हालाही आहे. दुबेंची धमकी भाजपचे महाराष्ट्रातील तमाम मंत्री आणि सगळ्या भाजपाईंसाठी आहे. भाजपच्या तमाम मंत्र्यांनो त्याने तुम्हालाही तुडवायची भाषा केली आहे. आता त्याच्याकडून तुडवून घ्यायचे की निशिकांत दुबेला तुडवायचा, हे भाजपच्या मराठी आमदार आणि खासदारांनी ठरवावे, असे वक्तव्य ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकशाहीचा उमाळा फुटला होता. महाराष्ट्रात आम्ही कोणालाही हिंसा करुन देणार नाही, असे ते बोलत होते, तसा आविर्भाव दाखवत होते. मग आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी जी भाषा वापरली आहे, ती कोणत्या शासन पद्धतीत बसते. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची काय भूमिका आहे? जेव्हा भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणतात की, आम्ही मराठी माणसाला आपटून आपटून मारु. हिंमत असेल त्यांनी बाहेर पडावं मग आम्ही काय करायचं ते करु. पहिला वार आम्ही करणार नाही, पण आमच्यावर वार झाला तर तो हात मुळापासून उखडून टाकू, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.





















