Rohit Pawar Pune :"भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं अधिकाऱ्यांना नांग्या मारण्यास सुरूवात केली"
Rohit Pawar on Bhagwan Pawar :"भ्रष्टाचाराच्या खेकड्यानं अधिकाऱ्यांना नांग्या मारण्यास सुरूवात केली"
आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्याने मंत्र्यांनी निलंबित केल्याचा रोहित पवारांचा आरोप
रोहित पवार यांनी काय म्हटलंय?
"आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या 'खेकड्या'ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या #पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री #डॉ. एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही #कीड काढण्यासाठी #सर्जरी कधी करणार?"