Reserve Bank | रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात आणखी पाव टक्का कपातीचा अंदाज
Reserve Bank | रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात आणखी पाव टक्का कपातीचा अंदाज
रिझर्व्ह बँक व्याजदरात आणखी पाव टक्के कपात करण्याचा तज्ज्ञांचा अंदाज, उद्या द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार
रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात आणखी पाव टक्का कपातीचा तज्ज्ञांचा अंदाज
रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली. महागाईत शिथिलता आल्याने या बैठकीत व्याजदरात पाव टक्क्यांच्या कपातीची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अमेरिकेकडून जशास तसे आयात कर वाढविण्यात येत असून, त्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचा नजरा आहेत.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय पतधोरण समिती बैठक सोमवारी सुरू झाली. या बैठकीतील निर्णयांची घोषणा मल्होत्रा हे बुधवारी (९ एप्रिल) करतील. पतधोरण समितीने याआधी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदरात पाव टक्का कपात करून ते ६.२५ टक्क्यांवर आणले होते. ही तब्बल पाच वर्षांनंतरची पहिली व्याजदर कपात ठरली होती. त्या आधीच्या अडीच वर्षांत बँकेने व्याजदरात कोणतेही बदल केलेले नव्हते.























