Maharashtra Cabinet Expansion : गिरीश महाजन, नरहरी झिरवाळ, दादा भुसे...; उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज दुपारी पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्री शपथ घेणार आहेत.
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज दुपारी पडणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आज 39 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रिपदे मिळणार आहे. शिवसेनेचे 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेणार आहे.
महायुतीत आज सकाळपासून नेत्यांना फोन करून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगितले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातून आतापर्यंत 6 नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेले आहेत. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दादा भुसे यांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. दादा भुसे यांनी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा विजय मिळवला आहे. तर शिवसेनेतून गुलाबराव पाटील यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आलाय. तसेच भाजपकडून गिरीश महाजन यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष राहिलेल्या नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातून कोण-कोण घेणार मंत्रिपदाची शपथ?
गिरीश महाजन - भाजप
जयकुमार रावल - भाजप
राधाकृष्ण विखे पाटील - भाजप
संजय सावकारे - भाजप
दादा भुसे - शिवसेना
गुलाबराव पाटील - शिवसेना
नरहरी झिरवाळ - राष्ट्रवादी काँग्रेस.
आतापर्यंत या नेत्यांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन
भाजप
1. नितेश राणे
2. शिवेंद्रराजे भोसले
3. चंद्रकांत पाटील
4. पंकज भोयर
5. मंगलप्रभात लोढा
6. गिरीश महाजन
7. जयकुमार रावल
8. पंकजा मुंडे
9. राधाकृष्ण विखे पाटील
10. गणेश नाईक
11. मेघना बोर्डीकर
12. अतुल सावे
13. जयकुमार गोरे
14. माधुरी मिसाळ
15. चंद्रशेखर बावनकुळे
शिवसेना शिंदे गट
1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
1. आदिती तटकरे
2. बाबासाहेब पाटील
3. दत्तमामा भरणे
4. हसन मुश्रीफ
5. नरहरी झिरवाळ
नागपुरात शपथविधीसाठी मोठी तयारी
राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet expansion) नागपुरमध्ये हा दुसरा शपथविधी पार पडत आहे. आधी 1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेस सोबत गेल्यानंतर त्यांचा नागपुरात तातडीने शपथविधी घेतला गेला होता. त्यानंतर आता दुसर्यांदा महायुती सरकारचा नागपुरात शपथविधी होत आहे. त्या शपधविधीची मोठी तयारी देखील करण्यात आली आहे.
आणखी वाचा