Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मंत्रिमंडळात सहा नव्या चेहऱ्यांना संधी, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांना डच्चू
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळाआज पार पडणार असून यात 39 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा (Maharashtra Cabinet Expansion) आज दुपारी पार पडणार असून 39 मंत्री शपथ घेणार आहेत. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रिपदे मिळणार आहे. शिवसेनेचे 11 मंत्री आज शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आज शपथ घेतील. शिवसेनेच्या वाट्याला 12 मंत्रिपदे आली असून आज सकाळपासून नेत्यांना फोन करण्यात आले आहे. मात्र, शिंदे गटातील तीन माजी मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. तर चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडून मंत्रिपदासाठीच्या आमदारांची यादी फिक्स झाली आहे. आपापल्या पक्षाकडून संभाव्य मंत्र्यांना फोन केले जात आहेत. शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची नावे आता समोर आली असून माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांना डच्चू देण्यात आला आहे. तर शिंदे गटातून सहा नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेतून कुणाकुणाला संधी?
- उदय सामंत
- प्रताप सरनाईक
- शंभूराज देसाई
- योगश कदम
- आशिष जैस्वाल
- भरत गोगावले
- प्रकाश आबिटकर
- दादा भुसे
- गुलाबराव पाटील
- संजय राठोड
- संजय शिरसाट
पाच जुन्या मंत्र्यांना पुन्हा संधी
1. उदय सामंत, कोकण
2. शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
3. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
4. दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
5. संजय राठोड, विदर्भ
'या' नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात मिळणार स्थान
- प्रताप सरनाईक
- भरत गोगावले
- योगश कदम
- प्रकाश आबिटकर
- संजय शिरसाट
- आशिष जैस्वाल
नागपुरात दुसर्यांदा शपथविधी
राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet expansion) नागपुरमध्ये हा दुसरा शपथविधी पार पडत आहे. आधी 1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा त्याग करून काँग्रेस सोबत गेल्यानंतर त्यांचा नागपुरात तातडीने शपथविधी घेतला गेला होता. त्यानंतर आता दुसर्यांदा महायुती सरकारचा नागपुरात शपथविधी होत आहे. त्या शपधविधीची मोठी तयारी देखील करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या