(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ravikant Tupkar रविकांत तुपकरांसह दीडशे ते दोनशे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात,पोलिसांचा लाठीचार्ज
सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला... आंदोलन स्थळी पोहचण्यासाठी पोलिसांना चकवा दिला... ते चक्क पोलिसाच्या गणवेशात घटनास्थळी गेले... त्यानंतर लगेचच त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि एकच गोंधळ झाला... पोलिसांनी आणि कार्यकर्त्यांनी वेळीच रोखल्याने तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न फसला... दरम्यान, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाली... त्यावर पोलिसांनी लाठीचार्जही केला... यात काही शेतकरी जखमीही झालेत... दरम्यान, तुपकर आणि ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना अज्ञान स्थळी नेण्यात आलंय... दरम्यान, या सर्व प्रकारामुळे तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप संताप व्यक्त केलाय... दरम्यान, पोलिसी गणवेशात आल्यामुळे तुपकरांवर कारवाई होणार का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय... तर दुसरीकडे रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही पाठिंबा दिलाय... त्यांचा फोन आल्याची माहिती आहे