Ratnagiri: आकाशात दीपमाळ कुठून आली? निसर्गाचा चमत्कार? ABP Majha
रत्नागिरीच्या आकाशामध्ये एक अकल्पित अशी दिव्यांची रांग जाताना दिसली आणि त्यावरुन चर्चांना उधाण आलेलं आहे. संगमेश्वर भागातल्या काही जणांनी ही ही घटना आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे.. म्हणजे या घटनेचे एकापेक्षा जास्त साक्षीदार आहेत... पण हा नक्की काय प्रकार होता... याची मात्र कुणालाच कल्पना नाही.. १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर या चार दिवसांमध्ये ही दिव्यांची अज्ञात माळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या आकाशात दिसल्याचा दावा केला जातोय...अर्थात हे पहिल्यांदा घडलेलं नाहीये...याआधीही ३ डिसेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये तर २२ जून रोजी गुजरातच्या जुनागडमध्ये त्याही वेळेला ही माळ एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने सोडलेल्या स्टार लिंक सॅटलाईट्सची रांग असू शकते, असा अंदाज बांधण्यात आला होता.. मात्र ही वस्तू नेमकी काय आहे, याचा उलगडा झालेला नाही.