एक्स्प्लोर
Tukdoji Maharaj Punyatithi: राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन, Gurukunj Mozari येथे लाखोंचा जनसागर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त अमरावतीच्या मोझरी येथील गुरुकुंज आश्रमात लाखो भाविक दाखल झाले आहेत. महाराजांच्या समाधीस्थळाला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 'सब साथ ऐसा अनुग्रह हो, सभी घरों में साधु सन्मित का। कब शांति होगी विश्व में तुकड़्या कहे,' असा शांततेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंतांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आले आहेत. श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ५ ते १२ ऑक्टोबर २०२५ या काळात पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात सामुदायिक ध्यान, भजन, कीर्तन आणि मौन श्रद्धांजली यांसारखे कार्यक्रम पार पडत असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















