Raj Thackeray on Ajit Pawar | काकांनी डोळे वटारले, पहाटेचं लग्न मोडलं, राज ठाकरेंकडून मिमिक्री
Raj Thackeray on Ajit Pawar | काकांनी डोळे वटारले, पहाटेचं लग्न मोडलं, राज ठाकरेंकडून मिमिक्री
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्यासाठी राज ठाकरे यांची सभा पुण्यातील शिवाजी पुतळ्यासमोर सभेचे आयोजन मनसैनिकांनी केली मोठी गर्दी किशोर शिंदे यांच्यासमोर भाजपच्या चंद्रकांत पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रकांत मोकाटे यांचं मोठं आव्हान राज ठाकरे - स्टेज वर आल्या आल्या राज ठाकरे फटाक्यावरून भडकले. एकदा सांगितल्यावर कळत नाही का ? माझा वेळ जातोय… रस्त्यातून मार्ग काढत येतो त्यात फटाके वाजतात.. आपल्या उत्साहाला आवर घातला पाहिजे.. हे फटाके आत्ताच फोडू नका २२ तारखेसाठी ठेवा मला प्रचाराच्या भाषणाचा कंटाळा येतो ही निवडणूक महत्त्वाची आहे अगोदरच्या कमी महत्त्वाच्या होत्या हा भाग नाही मात्र ही महत्त्वाची आहे. भविष्य सांगणारी आणि घडवणारी निवडणूक आहे राज्यात टाउन प्लानिंग नाही ठाणे जिल्हा जगातला एकमेव जिल्हा आहे जिथ ६-७ महापालिका आहेत २० तारखेला मतदानाला जाणार तेव्हा काय केलं महाराष्ट्रच लक्षात ठेवा २०१९ ला शिवसेना आणि भाजप मधे बहुमत होत मग अचानक पहाटेचा शपथ विधी झाल दोन्ही पक्षाला लोकांनी विरोधक म्हणून मतदान केलं त्यानंतर अचानक गळ्यात माळ घालून मुख्यमंत्री होतो त्यानंतर अडीच वर्षांनी ५० लोक घेऊन नवी सत्ता आली अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणं शक्य नाही म्हणून भाजप सोबत आले त्यानंतर अजित पवार थेट मांडीवर जाऊन बसले हे सगळं नागरिकांच्या मतदानाची प्रातरण आहे. आमच्या जातीचा आणि विचारांचा असलेल्याने काहीही केलं तरी चालत का ? महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तरप्रदेश करायचाय का ? कोणत्याही जातीत जा पण दुसऱ्या जातीचा द्वेष करू नका…. माझ्या उमेदवाराकडे जातीने बघू नका २० तारीख येणाऱ्या पिढ्यांच भविष्य ठरवणार आहे. पहिल्यासभेत बोललो होतो जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र बनवायचा आहे अस बोललो होतो