एक्स्प्लोर
UP Rahul Gandhi : उत्तर प्रदेशात राहुल गांधी मृत दलित तरुणाच्या कुटुंबीयांच्या भेटीला
उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये (Fatehpur) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मृत दलित तरुण हरिओम वाल्मिकीच्या (Hariom Valmiki) कुटुंबियांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी, 'दलित कुटुंबियांना धमकावून त्यांना मला भेटण्यापासून रोखले जात आहे', असा आरोप केला. रायबरेली जिल्ह्यात २ ऑक्टोबर रोजी हरिओम वाल्मिकी या तरुणाची चोर असल्याच्या संशयावरून जमावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केली होती. या भेटीदरम्यान, हरिओमच्या कुटुंबीयांनी राहुल गांधी यांच्यासमोर आपला आक्रोश व्यक्त केला. राहुल गांधींनी पीडित कुटुंबाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आणि न्यायासाठी लढण्याचे आश्वासन दिले. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
महाराष्ट्र
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























