(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Fload : संसार पाण्यात, अश्रू डोळ्यात, जबाबदार कोण?
Pune Fload : संसार पाण्यात, अश्रू डोळ्यात, जबाबदार कोण?
यंत्रणा सक्षम नसल्या आणि असलेल्या मोडीत काढलेल्या असल्या, की शहरवासीयांची आबाळ होऊन अख्ख्या शहराची कशी वाट लागते, हे शहराने गुरुवारी अनुभवले. पावसाच्या या थैमानात सात जणांचा बळी गेला. पाऊस जोरातच पडला, पण हवामान विभागाचे अगम्य इशारे, धरणातून पाणी सोडण्याबाबत समन्वयाचा अभाव यांत भरडला गेला, तो सामान्य पुणेकर. वेळोवेळी चर्चा झडूनही निसर्गाला अक्षरश: ओरबाडून त्याच्या उरावर उभ्या राहत असलेल्या विकास प्रकल्पांमुळे ज्या सामान्य माणसासाठी हे सगळे केले जात असल्याचा आव आणला जातो, त्याचेच जगणे किती जिकिरीचे झाले आहे, याचाही प्रत्यय आला. शहरवासीयांना ज्या हालांना सामोरे जावे लागले, त्यांची उत्तरे मागायची कुणाकडे, या निरुत्तरित प्रश्नाने गुरुवार मावळला… आजचा दिवस फक्त मागील पानांवरून पुढे असेल, की यातून काही शिकणारा?… प्रश्न संपलेले नाहीतच…