Praniti Shinde : आचारसंहितेतून पाणीवाटप वगळण्याची मागणी, प्रणिती शिंदेंचं निवडणूक आयोगाला पत्र
Praniti Shinde : आचारसंहितेतून पाणीवाटप वगळ्याची मागणी, प्रणिती शिंदेंचं निवडणूक आयोगाला पत्र. सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई; पाणी पुरवठ्याच्या सामाजिक कामासाठी आचारसंहितेमधून मुभा द्या, आमदार प्रणिती शिंदे यांचे निवडणूक आयोगाला पत्र सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून गावोगावी नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रतिवर्षी पाणी टंचाईची झळ बसू नये म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाटपासाठी प्रशासनासह विविध समाजसेवी संघटनांकडून पाण्याचे टँकर पुरवले जातात. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे टंचाईग्रस्त भागात पाणी वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. हीच अडचण ओळखून आमदार प्रणिती शिंदे यांनी टंचाईग्रस्त भागात सामाजिक संघटनांकडून पाणी वाटप करण्यासाठी आचारसंहितेमधून मुभा द्यावी, अशी विनंती करणारे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे.