एक्स्प्लोर
Zero Hour | Kasturba Hospital मध्ये 'प्रबोधनकार' पुस्तक वाद, Nurses आणि Kadam यांच्यात बाचाबाची
कस्तुरबा रुग्णालयातील एका घटनेमुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. ३० ऑगस्ट रोजी घडलेली ही घटना एका व्हायरल व्हिडिओमुळे आज उजेडात आली. रुग्णालयातील एक कर्मचारी राजेंद्र कदम यांनी निवृत्तीच्या दिवशी 'देवळांचा धर्म आणि धर्मासची देवळं' हे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं पुस्तक भेट म्हणून दिलं. मात्र, काही नर्सेसनी हे पुस्तक फेकल्याचं कदम यांचं म्हणणं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नर्सेस कदम यांना 'हिंदू धर्माचा अपमान करणारं पुस्तक तुम्ही का गिफ्ट केलं?' असा जाब विचारताना दिसतात. या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून, दोन्ही शिवसेना आणि मनसेसह अनेक पक्षाच्या नेत्यांनी यावर आवाज उठवला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी नर्सेसची बाजू ऐकून घेत कदम यांचे दावे फेटाळले. रुग्णालयाच्या परिसेविका ऋतुजा दडम यांनीही कदम यांचे आरोप फेटाळले. कदम यांनी म्हटले आहे की, "मी बहुजन समाजाच्या चळवळीत काम करतो. प्रबोधनाचं काम करतो. मी सगळ्यांना बहुजन समाजाला, सगळ्यांना मी माझं मानतो आणि मी तुम्हालाही आपलं मानतो आणि म्हणून म्हणलं तुमच्या जर भावना दुखावल्या असतील तर मी स्वारी बोलतो." माफी मागितल्यानंतरही त्यांच्या अंगावर पुस्तक फेकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सध्या चर्चा सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















