एक्स्प्लोर

Pooja Khedkar IAS Case वास्तव 46 : पूजा खेडकर यांचं IAS बनणं वादग्रस्त ठरण्याची शक्यता, कारण...

Pooja Khedkar IAS Case वास्तव 46 : पूजा खेडकर यांचं IAS बनणं वादग्रस्त ठरण्याची शक्यता, कारण... स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोईसुविधांची मागणी करत चमकोगिरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar IAS) यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर यांनी अपंग असलेलं सर्टिफिकेट दाखवून यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam) उत्तीर्ण झाल्याचा दावा केला जातोय. पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोष (Visual Impairment Certificate) असल्याचं सर्टिफिकेट दाखवून IAS पदरात पाडून घेतल्याची माहिती आहे. यूपीएससीने सहा वेळा दिल्लीच्या एम्समध्ये वैद्यकीय चाचणीसाठी बोलावूनही त्या गेल्या नाहीत. कुठल्यातरी सेंटरमधून त्यांनी एमआरआय अहवाल मिळवला आणि त्या आधारे त्या कलेक्टर झाल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पूजा खेडकर यांचे कलेक्टर बनणे हेच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.   पूजा खेडकरांचे IAS पद वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. यूपीएससी आणि  CAT ने विरोध केला असतानाही त्यांना IAS पद कसं देण्यात आलं? त्यांच्या नियुक्तीमागे कुठल्या राजकीय नेत्याने आपलं वजन वापरलं? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.   IAS होण्यासाठी पूजा खेडकरांनी काय काय केलं?  - पूजा खेडकर यांनी यूपीएससीची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिली आहे आणि त्यांना मेंटल इलनेस आहे अशी सर्टिफिकेट सादर केली. - पूजा खेडकर त्या आधारे विशेष सवलत मिळवून त्या आयएएस बनल्या. जर ही सवलत त्यांना मिळाली नसती तर त्यांना जितके मार्क्स मिळाले होते ते पाहता त्या आयएएस होणं अशक्य होतं .  - पूजा खेडकरांना जेव्हा आयएएसचा दर्जा मिळाला तेव्हा यूपीएससीने त्यांची वैद्यकीय चाचणी करायचं ठरवलं. मात्र तब्ब्ल सहा वेळा पूजा खेडकर यांनी वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचं टाळलं.  - सर्वात आधी 22 एप्रिल 2022 ला दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करायचं ठरलं. मात्र आपल्याला कोविड झाल्याचं कारण देत पूजा खेडकर यांनी जाण्याचं टाळलं.  - त्यानंतर 26 मे 2022 ला पुन्हा एम्स रुग्णालयात तर 27 मे 2022 ला दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी बोलण्यात आलं. मात्र पूजा खेडकर अनेकदा बोलावून देखील वैद्यकीय चाचणीसाठी गेल्या नाहीत.  - त्यानंतर 1 जुलैला त्यांना पुन्हा एम्समध्ये बोलवण्यात आलं. पण त्या गेल्या नाहीत.  - 26 ऑगस्ट 2022 ला पूजा खेडकर एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी तयार झाल्या. तिथे त्यांना 2 सप्टेंबरला एमआरआय चाचणीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं.  - पूजा खेडकर यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कशामुळे नाहीशी झाली याची तपासणी न्यूरो ओपथोमोलॉजिस्ट यांच्या उपस्थितीत या दिवशी होणार होती. मात्र एम्स रुग्णालयातील ड्युटी ऑफिसरने अनेकदा प्रयत्न करूनही पूजा खेडकर एमआरआयला उपस्थित राहिल्या नाहीत.  - त्यानंतर 25 नोव्हेंबर 2022 ला पुन्हा पूजा खेडकर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी पुन्हा नकार दिला.  - मात्र त्यानंतर त्यांनी एका एमआरआय सेंटर मधून अहवाल आणून तो यूपीएससीला सादर केला. मात्र यूपीएससीने त्याला हरकत घेतली आणि सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थात CAT मध्ये पूजा खेडकर यांच्या निवडीला आव्हान दिलं.  - त्यानंतर 23 फेब्रुवारी 2023 ला CAT ने पूजा खेडकर यांच्या विरोधात निकाल दिला.  - मात्र त्यानंतर असं काय घडलं की पूजा खेडकर यांनी सादर केलेलं ते एमआरआय सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात आलं आणि त्यांची नियुक्ती वैध ठरवून त्यांना आय ए एस दर्जा देण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे शक्य आहे का असा प्रश्न त्यामुळं विचारला जातोय.   कोण आहेत डॉ. पुजा खेडकर? (Who Is Pooja Khedkar IAS)  पुजा खेडकर या 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असून, जून महिन्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची पुण्यामध्ये नियुक्ती झाली. त्यानंतर चमकोगिरी केल्याने वादात सापडलेल्या पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.   पूजा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. दिलीप खेडकर हे राज्याच्या प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली. तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.  आता पूजा खेडकरांनी खोटी कागदपत्रं दाखवून IAS मिळवलं हे जर सिद्ध झालं तर केंद्र आणि राज्य शासन त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागेल. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
Embed widget