एक्स्प्लोर
Sandipanrao Bhumre:'खैरेंना हिमालयात पाठवण्यासाठी Rocket आणलंय', मंत्री संदीपान भुमरेंची टोलेबाजी
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी राजकीय फटाकेबाजी करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. 'लोकसभेला पडलो तर हिमालयात जाईन असं म्हणणाऱ्या चंद्रकांत खैरेंसाठी (Chandrakant Khaire) खास रॉकेट घेऊन आलो आहे, आता त्यांनी हिमालयात जावं', असा टोला भुमरेंनी लगावला आहे. एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी विविध नेत्यांसाठी फटाके निवडले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी आवाज न करणारा 'लसूण फटाका' तर आदित्य ठाकरेंसाठी (Aditya Thackeray) 'लवंगी फटाका' निवडला. अंबादास दानवेंना (Ambadas Danve) फक्त चमकणारी पण आवाज न करणारी 'सुरसुरी' दिली, तर संजय राऊत रोजच कुठे ना कुठे वाजतात म्हणून त्यांच्यासाठी फटाका घेतला नाही. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासाठी 'सुतळी बॉम्ब' तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यासाठी 'तोफ' खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं. या दिवाळीच्या निमित्ताने भुमरेंनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
महाराष्ट्र
शेत-शिवार
Advertisement
Advertisement

















