एक्स्प्लोर
TOP 100 Headlines : 1 PM : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 20 OCT 2025 : Maharashtra News
माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या वादग्रस्त विधानामुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बोगस मतदारांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. 'आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका,' असं वादग्रस्त विधान माजी मंत्री बच्चू कडू यांनी बुलढाण्यातील शेतकरी हक्क परिषदेत केलं आहे. तर, राज्यात तब्बल एक कोटी मतदार बोगस असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला असून, याविरोधात १ नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चाची घोषणा केली आहे. यावर, पुरावे द्या, आयोग कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. दुसरीकडे, पुण्यात शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्या नेतृत्वात हिंदू संघटनांनी आंदोलन केले. तसेच, आगामी निवडणुकीत मुंडे बहीण-भाऊ, पंकजा आणि धनंजय मुंडे (Pankaja and Dhananjay Munde), एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















