Pizza Delivery Boy Marathi : मराठीचा मुद्दा आणि पिझ्झावाल्याशी वाद, नेमकं काय घडलं?
Pizza Delivery Boy Marathi : मराठीचा मुद्दा आणि पिझ्झावाल्याशी वाद, नेमकं काय घडलं?
मुंबई च्या भांडुप परिसरात एका पिज्जा डिलिव्हरी बॉय ने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मराठी दांपत्य आणि त्या डिलिव्हरी बॉय मध्ये वाद झाला. भांडुप च्या साई राधे सोसायटीत घडलेली ही घटना आहे. पिज्जा डिलिव्हरी करणारा रोहित लेवरे हा या इमारती मध्ये एका दांपत्याला ऑर्डर केलेला पिज्जा देण्यास गेला. या वेळी या दाम्पत्याने त्याला मराठीत बोल तर पैसे देऊ अशी अट घातली. तरुण वाद सुरू झाला, या वादाचा व्हिडिओ या डिलिव्हरी बॉय ने बनवून व्हायरल केला आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठी भाषेवरून वाद समोर आला असून यात आता भांडुप चे मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
आजच्या महत्वाच्या घडामोडी -
काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
त्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली, श्रीनगर एअरबेसवर राजनाथ सिंहांचं वक्तव्य, भारतीय सैन्याचा देशवासियांना अभिमान असल्याच पुनरुच्चार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी युद्धविराम घोषणेवरून अमेरिकेतही टीका, ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं न्यूयॉर्क टाईम्सचं निरीक्षण
भारतात आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेत उत्पादन वाढवावं, डोनाल्ड ट्रम्प यांचा अॅपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला..टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा
पाकिस्तानच्या कुठल्याच अणुकेंद्रातून अणुगळती झालेली नाही, आंतरराष्ट्रीय अणुुऊर्जा संघटनेचा खुलासा, भारतानं सरगोधा हवाई तळावर हल्ला केल्यापासून चर्चांना ऊत
अहिल्यानगरमध्ये १३ कोटी ७५ लाखांचं ड्रग्ज जप्त, श्रीरामपूर पोलिसांची कारवाई, ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल.
















