एक्स्प्लोर

Pimpri Crime : गर्भपातावेळी प्रेयसीचा मृत्यू;दोन मुलांना नदीत फेकलं,आरोपीला फाशीची मागणी

Pimpri Crime : गर्भपातावेळी प्रेयसीचा मृत्यू;दोन मुलांना नदीत फेकलं,आरोपीला फाशीची मागणी विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला. त्यानंतर  मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही मुलांना इंद्रायणीच्या नदी (Indrayani River) पात्रात जिवंत फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्याच्या (Pune) मावळ (Maval) तालुक्यातून ही धक्कादायक आणि हादरुन सोडणारी घटना (Pune Crime) समोर आलीये. ही संतापजनक घटना 9 जुलै रोजी घडली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत.  या-मया न दाखवता दोन्ही मुलांना नदीच्या प्रवाहात जीवंत फेकून दिलं अधिकची माहिती अशी की, गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. 6 जुलै रोजी गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचं गर्भपात करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जीवंत फेकून दिलं.  पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघांकडून उडवाउडवीची उत्तरं दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे ही काही घडलंच नाही, असं वावरू लागले. दरम्यानच्या काळात प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबियांचा संपर्क होत नसल्यानं, तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होती. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन् दोघांनी घडला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Kolhapur Rautwadi Waterfall : सेल्फीच्या नादात पाण्यात पडला, वाहून जाताजाता थोडक्यात बचावला
Kolhapur Rautwadi Waterfall : सेल्फीच्या नादात पाण्यात पडला, वाहून जाताजाता थोडक्यात बचावला

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली, 2 जणांना अटक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली, 2 जणांना अटक
बायको घर सोडून माहेरी जाताना भांडीकुंडी सगळं घेऊन गेली, सामान परत आणायला नवरा टोळक्यासह लोखंडी रॉड घेऊन घुसला, उल्हासनगरमध्ये थरार
बायको घर सोडून माहेरी जाताना भांडीकुंडी सगळं घेऊन गेली, सामान परत आणायला नवरा टोळक्यासह लोखंडी रॉड घेऊन घुसला, उल्हासनगरमध्ये थरार
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या
Ajit Pawar NCP : अमोल मिटकरींनंतर राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने बोलून दाखवली अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा; म्हणाले...
अमोल मिटकरींनंतर राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने बोलून दाखवली अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा; म्हणाले...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Rautwadi Waterfall : सेल्फीच्या नादात पाण्यात पडला, वाहून जाताजाता थोडक्यात बचावला
Sanjay Raut Full PC : संदीप देशपांडेंच्या बोलण्यास अर्थ नाही, ठाकरे बंधू निर्णय घेतील!
Malegaon Election : माळेगाव कारखान्यात आज निवडणूक, दादा-ताईंनी बजावला मतदानाचा हक्क
Sandeep Deshpande PC:महाबळेश्वरचं अधिवेशन,22वर्ष जुनी जखम;देशपांडेंनी ठाकरेंच्या मर्मावर बोट ठेवलं!
Pandharpur Cycle Ringan Sohala : पंढरपुरात सायकल स्वारांचा रिंगण सोहळा, रक्षा खडसेंची खास उपस्थिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली, 2 जणांना अटक
पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई; पाकिस्तानी दहशतवाद्यांची ओळख पटली, 2 जणांना अटक
बायको घर सोडून माहेरी जाताना भांडीकुंडी सगळं घेऊन गेली, सामान परत आणायला नवरा टोळक्यासह लोखंडी रॉड घेऊन घुसला, उल्हासनगरमध्ये थरार
बायको घर सोडून माहेरी जाताना भांडीकुंडी सगळं घेऊन गेली, सामान परत आणायला नवरा टोळक्यासह लोखंडी रॉड घेऊन घुसला, उल्हासनगरमध्ये थरार
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या
धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; गाडीसमोरच कार्यकर्त्यांच्या उड्या
Ajit Pawar NCP : अमोल मिटकरींनंतर राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने बोलून दाखवली अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा; म्हणाले...
अमोल मिटकरींनंतर राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने बोलून दाखवली अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा; म्हणाले...
Dhule Case Scam : गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणाला एक महिना उलटला, पोलिसांकडून फक्त अदखलपात्र गुन्हा; ठाकरे गटाचा गंभीर आरोप, म्हणाले...
गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणाला एक महिना उलटला, पोलिसांकडून फक्त अदखलपात्र गुन्हा; ठाकरे गटाचा गंभीर आरोप, म्हणाले...
Iran vs Israel war: अमेरिकेने संहारक हल्ला केला पण इराणशी लढणं वाटतं तितकं सोपं नाही कारण... भारताच्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने सांगितलं कारण
जगाला अंदाजही नाही अशी लष्करी ताकद, इराणने शस्त्रात्रं कुठे लपवून ठेवलेत?
मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका; देवाभाऊंचं नाव घेत नितेश राणेंचा कोळी बांधवांना सल्ला
मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका; देवाभाऊंचं नाव घेत नितेश राणेंचा कोळी बांधवांना सल्ला
गंदा है पर धंधा है! ट्रम्पना नोबेल शिफारस करणाऱ्या पाकिस्तान अन् लष्करप्रमुख मुनीरांचा डाव समोर आलाच, ट्रम्प- पीएम शाहबाज कुटुंबही भागीदार
गंदा है पर धंधा है! ट्रम्पना नोबेल शिफारस करणाऱ्या पाकिस्तान अन् लष्करप्रमुख मुनीरांचा डाव समोर आलाच, ट्रम्प- पीएम शाहबाज कुटुंबही भागीदार
Embed widget