Sanjay Raut Full PC : संदीप देशपांडेंच्या बोलण्यास अर्थ नाही, ठाकरे बंधू निर्णय घेतील!
Sanjay Raut Full PC : संदीप देशपांडेंच्या बोलण्यास अर्थ नाही, ठाकरे बंधू निर्णय घेतील!
गेल्या काही दिवसांमध्ये मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT) युतीच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दोन्ही पक्षातील नेते युतीबाबत सकारात्मक असतानाच मनसे पक्षाचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून आलं. संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरुन संजय राऊतांवर हल्लाबोल करत त्यांना ताटातला चमचा म्हटलं होतं. युतीबद्दल दोन्ही पक्षप्रमुख निर्णय घेतील ताटातल्या चमच्याने ताटात राहावं असं देशपांडे यांनी म्हंटलं होतं. त्यानंतर आता देशपांडे यांनी केलेल्या टिकेला खासदार संजय राऊत यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे.
राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम ठेवावा लागतो. काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. कोण काहीही म्हणेल येड्या गबाळ्या सारख, त्याला अर्थ नाही, अशा शब्दांत राऊत यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं आहे.





















