एक्स्प्लोर
राज्यात पावसाचा धुमाकूळ, नदी नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत
राज्यात सध्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय. या पावसामुळं अनेक भागातील जनजीव विस्कळीत झालंय.
Maharashtra Heavy rains
1/10

राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
2/10

मुसळधार पावसामुळं रस्त्यांवर पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर देखील परिणाम होत आहे.
3/10

पुणे शहरासह परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आलं आहे.
4/10

रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका रोहा आणि सुधागड तालुक्यातील पाली नागोठणे शहरामध्ये बसलेला पाहायला मिळत आहे.
5/10

संततधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम होत आहे. संथ गतीनं वाहतूक सुरु आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
6/10

खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याचे पातळी ओलांडली आहे. नगरपरिषदेने सायरन देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.जगबुडीचे पाणी मटन मार्केट परिसरामध्ये शिरलं आहे.
7/10

जगबुडी नदी शेजारील सर्विस रोड पाण्याखाली गेल्यामुळे खाडी पट्ट्यातील गावांचा खेडमध्ये येणारा जवळचा मार्ग बंद झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका कायम आहे. .
8/10

नाशिक जिल्ह्यात देखील सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे.
9/10

महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळली ,10 फूट रस्ता खचला आहे.
10/10

गेल्या तीन दिवसापासून डोंगरी भागामध्ये मोठा पाऊस सुरू आहे. दरड कोसळल्यामुळं महाबळेश्वर कडून तापोळ्याला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
Published at : 19 Jun 2025 01:43 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























