एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case: 'कोणतीही वैयक्तिक डायरी मिळालेली नाही', पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा खुलासा
फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने (Doctor Suicide Case) राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोशी (SP Tushar Doshi) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 'डॉक्टर महिलेची कोणतीही वैयक्तिक डायरी मिळालेली नाही', असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्ट केले आहे. मृत डॉक्टरच्या मोबाईलमधील कोणताही पुरावा डिलीट झालेला नाही आणि सर्व डिजिटल पुराव्यांची सायबर टीममार्फत तपासणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते, ज्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, कुटुंबाने एसआयटी (SIT) चौकशीची मागणी केली आहे, तर अनेक राजकीय नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


















