RBI : दंडात्मक शल्कावर पुन्हा व्याज आकारता येणार नाही, कर्ज संस्थांसाठी आरबीआयचे नवे मार्गदर्शक तत्व
कर्ज आणि कर्ज देणाऱ्या संस्था याबद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आहे. दंडात्मक व्याजाचा वाजवीपणा आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेनं काही मार्गदर्शत तत्वं जाहीर केले आहेत. यातील सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे कर्जदाराकडून कर्ज कराराच्या नियमांचे पालन न केल्यास आणि दंड आकारल्यास ते दंडात्मक शुल्क मानले जाईल. दंडात्मक शुल्कावर पुन्हा व्याज आकारले जाणार नाही. व्याज दर आणि सेवा शुल्कासंदर्भात वित्तीय संस्थांच्या वेबसाईटवर उल्लेख असावा, सोबतच दंडात्मक शुल्काचे प्रमाण आणि कारण संस्थांद्वारे कर्जाच्या करारात ग्राहकांना स्पष्ट सांगितलं जावं, असंही या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

















