एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोपा, सारथी कोण?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील सुमारे १८०० कोटींची 'महार वतन' प्रकारातील सरकारी जमीन अवघ्या ३०० कोटींना विकत घेतल्याचा आणि त्यावर मुद्रांक शुल्कही माफ केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 'असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कोणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या,' असे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले असून, अमेडिया कंपनीला नोटीसही बजावण्यात आली आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले असून अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















