एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : भुजबळ म्हणाले, जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना; आता राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाले, अजितदादांनी त्यांच्यासाठी...

Chhagan Bhujbal : महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Chhagan Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) रविवारी झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात असून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना डच्चू देण्यात आला. आज छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली. जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असे त्यांनी म्हटले. छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सूचक वक्तव्य केलंय. 

अमोल मिटकरी म्हणाले की, भुजबळ नाराज नाहीत. चुकीची बातमी चालवली जात आहे. भुजबळ म्हणत असतील जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, तर त्यांची ही देखील आवडीची ओळ आहे की, तेरे बिना दिल नहीं लगता. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आत्मा आहेत. त्यामुळे आत्मा शरीर सोडून जात नसतो.  भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही याचा अर्थ असा की, अजित पवारांनी त्यांच्यासाठी मोठी संधी राखून ठेवली असेल. अजित पवार कुणावर अन्याय करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? 

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं की, मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. परंतु, सात-आठ दिवसांपूर्वी माझं वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू, असे म्हटले. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक लढवा. तेव्हा तुम्हाला येवल्यातून लढलं पाहिजे, असं सांगण्यात आले. तुम्ही लढाईत असला तर पार्टी जोमानं पुढं जाईल, असं सांगितलं गेलं. माझ्या येवला-लासलगाव मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो. राज्यसभेवर ताबडतोब जाऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल. येवल्याच्या मतदारांचा विश्वासघात ठरेल. मला ज्यांनी प्रेम दिलं त्यांच्याशी मी प्रतारणा करणार नाही, असे त्यांनी म्हटले. तर पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? असे विचारले असता “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, असे सूचक वक्तव्य छगन भुजबळांनी केले.

आणखी वाचा

भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Chavan :मी मुख्यमंत्री असतो, तर नांदेडला मंत्रिपद देण्याचा विचार केला असताRajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराजNarendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात महायुतीच्या सर्व आमदारांना निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
Embed widget