एक्स्प्लोर

Nagpur News : महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष   

Rashtriya Swayamsevak Sangh : महायुतीच्या सर्व आमदारांना नागपुरातील राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे.

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार पडला. यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर (Maharashtra Cabinet Expansion) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

अशातच नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने महायुतीचे सर्व आमदार नागपुरात उपस्थित आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व आमदारांना नागपुरातील राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. येत्या 19 तारखेला सकाळी 8 वाजता संघ कार्यालयात उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण संघाच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहे. तर महायुतीचे सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. मात्र या निमंत्रणाला अजित पवार आणि त्यांचे आमदार उपस्थित राहणार का? याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पुन्हा 'त्या' घटनेला उजाळा  

दरम्यान,  तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रेशीमबाग मैदानावरील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपताच शेजारीच असलेल्या संघाच्या रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन  परिसरात भेट दिली. दोघांनी त्या ठिकाणी संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळाला ही भेट देत वंदन केले होते.  मात्र, संघ कार्यालयाच्या परिसरात जाऊनही तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) संघाचे आद्य  सरसंघचालक डॉ.हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणे टाळले होते. 

संघ कार्यालयाच्या परिसरात जाऊनही अजित दादांनी समाधीचे दर्शन घेणे टाळले!

नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला  राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंसह महायुतीतील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात नागपूरसह विदर्भातून हजारोंच्या संख्येने महिला  उपस्थित झाल्या असून पेंडोलमध्ये बसायला जागा देखील शिल्लक नसल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे शेजारचे सुरेश भट सभागृहात ही महिलांच्या बसण्याची व्यवस्था करावी लागली होती.

दरम्यान, हा कार्यक्रम आटोपल्यानंतर  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी संघ कार्यालयात हजेरी लावली होती. मात्र अजित दादांनी संघ कार्यालयाच्या परिसरात जाऊनही अजित दादांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या  समाधीचे दर्शन घेणे टाळले होते. त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा     

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajendra Gavit on Cabinet|महायुतीच्या मंत्रिमंडळात आदिवासी आमदारांना स्थान नाही,राजेंद्र गावित नाराजNarendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोलेChitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
गडकरींच्या भेटीनंतर मुनंगटीवार थेट बोलले, म्हणाले; ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून लढला, त्यांना मंत्रिपद दिलं, कालपर्यंत माझं नाव होतं, पण...
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
भुजबळांसारख्या वरिष्ठ ओबीसी नेत्याला मंत्रिमंडळात स्थान न मिळणे दुर्दैवी; बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया, म्हणाले, मनोज जरांगे...
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Embed widget