Petrol : देशात सर्वात महाग पेट्रोल परभणीत, प्रतिलिटर दर 121 रुपयांवर ABP Majha
जगात जर्मनी भारतात परभणी असं म्हटलं जातं... त्यात आता पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष परभणीकडे गेलंय.. कारण परभणीत पेट्रोल दराचा भडका उडालाय. देशातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळतंय. परभणीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 121 रुपये 34 पैसे इतके आहेत. तर परभणीत डिझेल दरही प्रतिलिटर 103 रुपये 15 पैशांवर पोहोचलेत. मराठवाड्यामध्ये इंधन साठवण्यासाठी डेपो नसल्यामुळे परभणीला उत्तर महाराष्ट्र अथवा विदर्भातून इंधन आणावे लागतं. विदर्भातून इंधन आणण्यासाठी जास्त खर्च येत असल्याने मनमाड येथून साडेतीनशे किलोमिटर अंतरावरुन इंधन आणावे लागतंय. परिणामी खर्च वसूल करण्यासाठी परभणीत इंधनाचे दर अधिक असल्याची बाब समोर आलीय. तर राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल दर प्रति लिटर 120 रुपयांवर पोहोचलेत. देशात गेल्या 14 दिवसांत पेट्रोल आणि डिझेल दरात सुमारे साडेआठ रुपयांची वाढ झालीय.