Pankaja Munde Meet Sachin Family : भावनिक होऊन टोकाचं पाऊल उचलू नका, पंकजा मुडेंचं आवाहन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदार संघात पराभव झाल्याने शिरूर तालुक्यातील वारणी येथील गणेश बडे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अंत्यविधी प्रसंगी पंकजा मुंडे या वारणी येथे पोहचल्या. यावेळी बडे यांच्या कुटुंबाचा आक्रोश एकूण उपस्थित नेत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर जिल्ह्यात तिघांनी आत्महत्या केल्या आहेत.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मुंडे साहेब गेल्यानंतर मी शपथ घेतली होती की मी कधीच रडणार नाही. मी शपथ घेतली होती की मी लढणार आहे रडणार नाही पण आता कशाच्या जीवावर लढू मी. माझ्यासाठी स्वतःचं जीवन बाजूला सारून काम करणारी माणसं बघितलं, पण माझ्यासाठी स्वतःचा आयुष्य संपवणारी मुलं मी आज बघितले. एखादा माणूस आपल्यातून निघून गेला की, त्याची पोकळी त्याच्या कुटुंबाला जाणवत असते, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
तुमच्या जिवात आमचा जीव असतो. मुंडे साहेबाला त्यांच्या चीते समोर मी जे वचन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी राजकारणात आहे. आपल्या कुटुंबाला आपल्या जवळच्या माणसाला असं उघड्यावर पाडून स्वतःच आयुष्य संपवू नका कोणीही आत्महत्या करू नका. गणेश च्या दोन्ही मुलीची जबाबदारी मी घेणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.