(Source: ECI / CVoter)
Onion Exporter On Goverment Decision : ऐन निवडणुकीत कांद्यावरील निर्यातबंदी हटली, उत्पादकांना दिलासा
७ डिसेंबरला कांद्यावर निर्यातबंदी लावल्यानंतर ३१ मार्चपर्यंत ती कायम ठेवण्यात आली होती..त्यानंतर ३१ मार्चच्या दरम्यान पुन्हा एकदा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून नोटिफिकेशन काढत निर्यातबंदी कायम ठेवण्यात आली होती..ती आजतागायत कायम होती..दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्यातमूल्य लावत काही अटी शर्ती लावून निर्यातबंदी पूर्णतः खुली करण्यात आली आहे.. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आज तसे नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले..या निर्णयाचे राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून स्वागत करण्यात आले असून कुठलेही निर्यातमूल्य न लावता व अटी शर्ती न घालता निर्यातबंदी खुली व्हावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे तर कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक असून निर्यात बंदी उठली असे वाटत असले तरी निर्यात शुल्क तसेच ठेवल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे..