Onion Export Special Report : कांद्याच्या निर्यातीला ब्रेक; शेतकऱ्यांचा उद्रेक
Onion Export Special Report : कांद्याच्या निर्यातीला ब्रेक; शेतकऱ्यांचा उद्रेक केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं शेतकरी आणि व्यापारी दोघांमध्ये उद्रेक बघायला मिळत आहेत, शुक्रवारी जिल्ह्यात ठिक ठिकाणी आंदोलनं झाल्यानंतर आज पासून लिलाव बंद करण्याची हाक कांदा व्यपर्यानी दिली होती, त्याला जिल्ह्यातील बाजार समितीत प्रतिसाद मिळतोय. काही शेतकरी 60 ते 70 किलोमीटर अंतर पार चांदवड, पिंपळगाव बाजार समितीत जाऊन नाशिक बाजार समितीत पोहचत आहेत, त्यामुळे कांदा गोणी लिलाव होणाऱ्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पहिल्यांदाच खुल्या ट्रॅक्टरमधून कांदा दाखल झालाय, शेतकरी दूरवरून आल्यानं त्याचे नुकसान होऊ नये म्हणून सुरवातीला आलेला कांदा घेत असल्याचे व्यापारी सांगत आहेत, मात्र यावेळी नाशिक जिल्हा नाही तर सम्पूर्ण देशभरात बंद पुकारला जाईल असा विश्वास व्यापारी व्यक्त करत आहेत, त्यामुळे केंद्र सरकार काय मध्यममार्ग काढणार याकडं लक्ष लागलय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
